मालकीण
तोंडावरचा पदर हलला तसे सोनीचे डोळे उघडले. अंगावर आवघा जयवंत्या ओणवलेला. दोन केसाळ मजबूत हातं सोनीच्या खांद्यावर रोवलेले. जेसीबीने आर्म रोवून स्वतःला उचलावे तसा झुकलेला जयवंत जरा वर उठला. "फुकने, दोन दिवसात पैशाची सोय बघाया सांग हांडग्याला. डीलर मागं लागलाय. डिलीव्हरी देतो म्हंतय लगीच" "आरं करनार तरी कसं, तुझी भूक मोठी, येवढं न्हाय झेपाया त्यांस्नी." "त्याला झेपाया न्हाई म्हनून तर खाली हैस न्हवं माझ्या. आता तूच बघ ते" "आरं हजारपाचशाची बातंय व्हय, घरातबी नसतेत येवढं" "सोने, आखरीचं सांगतो, चोरी कर, डाका घाल पन मला पाच लाख दे" "उठंय उंडग्या, काय ते नंतर बघू. आता जे घ्यायला आला हाईस ते घेऊन जा" ............................. सोळा सतराची सोनी म्हनलं तर आंगांग फुलल्याली झेंडूच जणू. पिवळ्याजर्द साडीत आगदी कात टाकलेल्या नागिनीगत चमकायची. सोताच्याच मस्तीत वळायची. खुडक बापाच्या खोकल्यानं बेजार झोपडी सोनी आसली की नागपंचमीच्या वारुळागत नटायची. जानारायेनारा वळूवळू बघायचा पन सोनी सोताच्याच नादात. चारचौघीगत कधी दिसली न्हाई की वा