Posts

दिव्यचक्षु अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीच्या ऐसी केबिनात सगळ्यात सामसूम पीसीवरच्या स्क्रीनसमोर सगळ्यात शेवटच्या अ‍ॅड डिझाईनच्या सगळ्यात शेवटच्या टॅगलाईनवर मी काम करतो. रास्टर फोटोशॉप अन् व्हेक्टर कोरलवर अनिर्बंध सत्ता चालते ज्याची आणि कम्प्युटर ग्राफिक्सध्ये ज्याचे चालतात हात डिझाईनर पॅडवर हवे तसा माऊस वळवत तो मी एज्युकेटेड क्रियेटिव्ह डिझाईनर. एजन्सीचे मालक सतत नजर ठेवतात पाठलाग करतात चुकलेली प्रुफे घेऊन चुका काढतात स्वतःलाच न कळणार्‍या स्क्वेअरसेमीच्या व्यवहाराचा एकटाच हा शत्रू. डिझाईनर होतोय क्रियेटिव्हली नि:संतान. गडगंज क्लायंट आणतो आधीच फसलेली येडझवी स्कीम एखादी मोठ्या कॅम्पेनिंगची काल्पनिक कारंजी उसळतात जाहीरातींचे लेआऊटवर लेआऊट प्रिंटतात नव्या कन्सेप्टची कुदळ मारली जाते पुन:पुन्हा रडतो डिझाईनर टेबलावर डोके ठेवून एका मास्टरस्ट्रोक कन्सेप्टच्या जन्माची प्रार्थना करतो. आर्टिस्ट. व्हिज्युअलायझर, मेंटॉर.
ताल ठाक ठण्ण ठाक आवाजाने विजू उठला, भीमसू बारक्या पितळी हातोडीनं संबळ ठोकत होता. बापाला कितींदा सांगितलं अंधाराचं दिवाबत्ती तर कर म्हणून. आयकायचं रक्तातच नाही. गार पाणी डोक्यावर ओतून विजूने कापडं हुडकायला सुरुवात केली. शाळेचा गणवेशाच्या चड्डीवरच मंडळाने दिलेला शर्ट घालूस्तवर भीमश्या कवड्यानी सजलेली अन कुंकवानं माखलेली पडशी घेऊन बाहेर झाला. पहाटेच्या अंधारातच बापलेकानी देवळाच्या बाहेरुन हात जोडले. देवडीचा चिंचोळा जिना चढून बसताच गाभारा उजळलेला दिसला. हरीभटजी काकड्याला सुरुवात करायला अन चौघडा वाजायला गेली ५० वर्शं तरी खंड पडलेला नव्हता. .. आभाळ गुलाबी व्हायला लागलं तसं भीमश्याचं हात भरु भरु आलं. कसंबसं आवरुन विज्याला घेऊन मंडपासमोर आला. भीमश्याच्या डोळ्यासमोर लक्षीच दिसायली. लेकराला पदरात टाकून गेली बिचारी. शिकवू म्हणायची लेकराला. काय करावं आन काय न्हाय. दोन टायमाचं खाणं निघायचं. आता हे पोरगं आयटीआय करायचं म्हणतंय. कुणाला कौल लावावा काय कळेना. सवाशिण बायासमोर अन गावच्या एकमेव मारवाड्यासमोर आरती फिरवून हरीभटजी बाहेर आला. चार केळं आन धाची नोट भीमश्याच्या पडशीत वरनंच पडली....
मदत "देवा ते प्रेस नोट झाली का हो तयार?" "करतोय साहेब" "ती कॉन्फरन्सची पावती फाडा काय असल ती. पाकीटासहीत प्रेस्नोट देऊन टाका" "हो साहेब" "ते आपलं ल्याबराडार कुठं खपलंय? फोटोसहीत कव्हरेज पाह्यजे म्हणाव. नुसती हाडकं चघळाया पाय्जेत" "सांगतो साहेब" "ते फाउंडेशनचं काय लागतय का पत्ता?" "साहेब तेनी बीड ला हायत म्हणं कार्यक्रमाला" "बघावं का सांगून दादासाहबाकडून?" "नको साहेब, कव्हरेज तेनीच खातेत, आकडा बी आधीच द्यावा लागतो म्हण" "राव्ह दे राव्ह दे. आपन हाव हितं. आपनच करायचं" "हो साहेब" "ते आमचे शेक्रेट्री कुठं खाजवत बसलेत, पाठवा जरा." "हो साहेब" ................. "कामाच्या टायमाला कुठं हिंडता राजे?" "हाय की साहेब, जरा ते पत्ते लिहून काढीत होतो" "किती निघालेत?" "बावीस हायत. आकडा मेन्शन करावा का?" "नाय नाय. बावीस म्हणजे मोठा खुट्टाय राव, परहेड कमी करावं लागतील" "मग कसं करावं? चेक तय...
त्रैराशिक ह्यालो बोल ग हिरॉईन आयक की रव्या. मला कनाय राव्हल्या भेटला होता. तूच बोंबलत गेली आसचील. आता म्या नाहीना गावात. काय भरोसा नाय तुझा. हा. तू लै शिटीत सवळाच राह्यलास जनू. मी हाय म्हनून नायतर छप्पन्न फिरतेत माझ्यमागं. हा म्हैते लै फेरनलवलीची औलाद. ते जौ दे. पह्यले मला सांग किती मरतोस माझ्यावर? म्या व्हय? समज बत्तीस जीबी तर आसंन. राव्हल्या काय केला ते सांग ऊंडगे आदी. तेचाकडं कनाय तसला आंडराड मोबाईल हाय. फोटो पाटिवता येतेत मन. मग? मग काय. म्या नीट्ट सांगितलं. जेचं माज्यावर सच्चं प्रेम तोच घिऊन दील मला आसला फोन. लै नीच हायस ग टवळे. नेक्स्ट टैम आनतो. ________________________________________________________________________ ह्यालो ह्यालो बोल की आये. एकतर मिस्कॉल करतीस आन कॉल केल्यावर बोलाया काय हुतय. आरं रव्या आयक की. आता म्होरं बोलतीस का ठिवू फोन. मला हापिसाला जायचय. जाशील रं बाळा पण आयक की. ह्ये तुझा बाप काय सुदरंना बग. आता काय केलं? आन ह्यो नंबर कुनाचाय? तेच रं. काल पिऊन कुठं उलथला की दारुपायी इकून आला मोबाईल देव जाणं. मग? तसं नव्हं र बाळा. आता म्होरल्या टाय...
क्लोज   भोसले, एक बी पंटर सुटला नाय पायजे. चारी बाजूनी प्याक करायचे, काय? होय सर. तिज्यायला रतनखत्रीची औलाद. एकबी चिट्ठी दिसायला नाय पायजे. मटका बंद म्हण्जे बंद. होय सर. चला सुटा. +++++++++++++++++++++ उचल उचल भाड्याला. भोसले ते पिवळा शर्टवालं गाबडं पळालं बघा. आपल्याच व्हॅनकडं पळतय. धरा त्येला. +++++++++++++++++++++ भाडखाऊ कुठं पळतो बे? न्हाय साहेब. तुमच्याच गाडीकडं आलो की. कुत्र्या, पळायला काय झालं सांग अन बस आत नीट. व्हय साह्येब. मागच्या टायमाला जागाच मिळाली नाही व्हॅनमदी. पार जेलरोडपत्तर उभ्याने नेलता मला. तुझ्यातर आयला. भडव्या ओपनला काय आज? साह्येब तिर्री सत्ती. उभा राहा भेनचोद आता. क्लोज बी गेला. उद्या ओपनला बसली फिगर तर सुटतोस बघ. +++++++++++++++++++++
अंतर काय खरं नाही बघा आयटीचे साहेब. तुमचा निखिल आयटीलाच ना पुण्यात? हो रे, चांगले पगार असतात पण त्यांना. अमेरिकेत काय लैच मंदी आलीय म्हणं. मग ह्यांचं अवघडच की सगळं. ___________________________________________________________________ लहानशा गावातली सिंगल ब्रँच कोऑपरेटिव्ह बँक अन धडपडून मिळालेली मॅनेजरची खुर्ची. सोमवारची गर्दी अन कॅश कौंटरला टोकन घेऊन गावगन्ना पत्रकार कम संपादकाने घातलेला उगा वाद. बँकेत खड़खडाट अशी प्रश्नचिन्ह टाकलेली बातमी अन ब्लॅकने खपलेला त्याचा पेपर. खातेदारांची पैसे काढायला गर्दी अन संचालकांनी मारलेली कलटी. मर्जिंगआधीच्या कोर्टातल्या सुनावण्या अन बिनपगारी ढकललेली वर्षे. एकेक रुपया जोडत शिकवलेला मुलगा अन एका चिल्लर पतसंस्थेत गहाण टाकलेली जिंदगी. ___________________________________________________________________ हॅलो निखिल, बेटा ठिक चाललंय ना सगळं तिकडे?
वायला "किरण्या लका आवल की लौकर" लालजर्द लिपस्टीक ओठावर फिरवायच्या आधी तोंडातली तंबाखू थुंकायला किरण्या उठला. ऊंच टाचेचा तोल सांभाळत चुडीदार सावरुन अन ओढणी ओढून परत गायछाप मळायला लागला. "किरण्या, तुझी सुपारी नाय फोडायला चाललो भाड्या. येतोयास का न्हाय?" "आहाहा आली माझी डार्लिंग. आयायाया काय दिसतीया" म्हणत दिप्याने किरण्याला आवळला. "गपेय तुझ्यायला. आजची हजाराची लेवल कर अन पाश्शे त्या राणीवर घालीव. हितं काय उपेग नाही. मला नड हाय पाचशाची तेवढे गावले की बास्स" दिप्याने झाडीत लावलेली यामा काढली. ओढणीनं तोंड झाकून किरण्या मागं बसताच गिअरमध्येच उचलली. घाटाखाली हायवेवर किरण्याला सोडून दिप्या सराट घाटाच्या वर धाब्यावर जाऊन बसला. परश्या न आज्या आधीच मोबाईलात तोंडं घालून कोपर्‍यात बसले होते. तिसरी सिग्रेट पेटवणार इतक्यात दिप्याचा फोन बारीकसा वाजला. पाटदिशी दोन गाड्या धाब्यावरुन हलल्या. घाटातून वर चढणारे दोन ट्रकलाईट पार वरुन दिसत होते. कोपर्‍यावर लाईट बंद होऊन दोन्ही ईंडिकेटर चमकायला लागले तसा दिप्याने अ‍ॅक्सीलेटर पिळला. ट्रक गाठस्तोवर ड...