कासव
"ए बामणा, मुत्त्या बोलावतंय बघ आमचं तुला. बघ काय म्हणतंय येड्या भोकाचं" "तुझैला तुझ्या तीन एकर. बापंय कीबे तुझा" "बाप नाय डोस्क्याला ताप हाय" आप्पा कोरे म्हणजे अॅक्चुअली डोस्क्याला ताप कॅटेगरीतलाच. पण त्याच्या पध्दतीने विचार केला तर ताप. नायतर मुत्त्या वागायला सरळ. दिवसभर बारक्या दुकानात गोळ्या चॉकलेटं अन कुरकुरे विकायचा. खरा धंदा व्ह्यायचा पुड्या सिगरेटीवर पण पाटी यल्लम्मा किराणा दुकान अशीच. सकाळी कपाळाला फासलेली इबित्ती घामाच्या ओघळात वाहून जाईपर्यंत धंदा व्ह्यायचा. जसा दिवस बुडायला लागायचा तसं दुकान आप्पाच्या मित्रांनी भरायचं. येस्टीड्रैव्हर बाशा, आर्मीमन आवचार, पुजारी ग्रामोपाध्ये आणी अशाच चारसहा बिलंदरांनी दुकान भरवलं की झ्याट गिर्हाईक फिरकायचं नाही तिकडं. ह्यांच्या सगळ्यांच्याच बुध्द्या अचाट. कुणाला कसं घोळात घेतील सांगता येणार नाही. बायाबापड्यां तर संध्याकाळच्याला तिकडं फिरकायच्याच नाहीत. असल्या आप्पा कोरेचंं गाबडं म्हणजे श्रीशैल. आमचं दोस्त. बापाचा इरसालपणा जरा कमीच उतरलेला लेकात. बापलेकाचं पटलंही नाही कधी. "का बे शिर्या, मो...