त्रैराशिक ह्यालो बोल ग हिरॉईन आयक की रव्या. मला कनाय राव्हल्या भेटला होता. तूच बोंबलत गेली आसचील. आता म्या नाहीना गावात. काय भरोसा नाय तुझा. हा. तू लै शिटीत सवळाच राह्यलास जनू. मी हाय म्हनून नायतर छप्पन्न फिरतेत माझ्यमागं. हा म्हैते लै फेरनलवलीची औलाद. ते जौ दे. पह्यले मला सांग किती मरतोस माझ्यावर? म्या व्हय? समज बत्तीस जीबी तर आसंन. राव्हल्या काय केला ते सांग ऊंडगे आदी. तेचाकडं कनाय तसला आंडराड मोबाईल हाय. फोटो पाटिवता येतेत मन. मग? मग काय. म्या नीट्ट सांगितलं. जेचं माज्यावर सच्चं प्रेम तोच घिऊन दील मला आसला फोन. लै नीच हायस ग टवळे. नेक्स्ट टैम आनतो. ________________________________________________________________________ ह्यालो ह्यालो बोल की आये. एकतर मिस्कॉल करतीस आन कॉल केल्यावर बोलाया काय हुतय. आरं रव्या आयक की. आता म्होरं बोलतीस का ठिवू फोन. मला हापिसाला जायचय. जाशील रं बाळा पण आयक की. ह्ये तुझा बाप काय सुदरंना बग. आता काय केलं? आन ह्यो नंबर कुनाचाय? तेच रं. काल पिऊन कुठं उलथला की दारुपायी इकून आला मोबाईल देव जाणं. मग? तसं नव्हं र बाळा. आता म्होरल्या टाय...
Posts
Showing posts from 2015
- Get link
- X
- Other Apps
क्लोज भोसले, एक बी पंटर सुटला नाय पायजे. चारी बाजूनी प्याक करायचे, काय? होय सर. तिज्यायला रतनखत्रीची औलाद. एकबी चिट्ठी दिसायला नाय पायजे. मटका बंद म्हण्जे बंद. होय सर. चला सुटा. +++++++++++++++++++++ उचल उचल भाड्याला. भोसले ते पिवळा शर्टवालं गाबडं पळालं बघा. आपल्याच व्हॅनकडं पळतय. धरा त्येला. +++++++++++++++++++++ भाडखाऊ कुठं पळतो बे? न्हाय साहेब. तुमच्याच गाडीकडं आलो की. कुत्र्या, पळायला काय झालं सांग अन बस आत नीट. व्हय साह्येब. मागच्या टायमाला जागाच मिळाली नाही व्हॅनमदी. पार जेलरोडपत्तर उभ्याने नेलता मला. तुझ्यातर आयला. भडव्या ओपनला काय आज? साह्येब तिर्री सत्ती. उभा राहा भेनचोद आता. क्लोज बी गेला. उद्या ओपनला बसली फिगर तर सुटतोस बघ. +++++++++++++++++++++
- Get link
- X
- Other Apps
अंतर काय खरं नाही बघा आयटीचे साहेब. तुमचा निखिल आयटीलाच ना पुण्यात? हो रे, चांगले पगार असतात पण त्यांना. अमेरिकेत काय लैच मंदी आलीय म्हणं. मग ह्यांचं अवघडच की सगळं. ___________________________________________________________________ लहानशा गावातली सिंगल ब्रँच कोऑपरेटिव्ह बँक अन धडपडून मिळालेली मॅनेजरची खुर्ची. सोमवारची गर्दी अन कॅश कौंटरला टोकन घेऊन गावगन्ना पत्रकार कम संपादकाने घातलेला उगा वाद. बँकेत खड़खडाट अशी प्रश्नचिन्ह टाकलेली बातमी अन ब्लॅकने खपलेला त्याचा पेपर. खातेदारांची पैसे काढायला गर्दी अन संचालकांनी मारलेली कलटी. मर्जिंगआधीच्या कोर्टातल्या सुनावण्या अन बिनपगारी ढकललेली वर्षे. एकेक रुपया जोडत शिकवलेला मुलगा अन एका चिल्लर पतसंस्थेत गहाण टाकलेली जिंदगी. ___________________________________________________________________ हॅलो निखिल, बेटा ठिक चाललंय ना सगळं तिकडे?
- Get link
- X
- Other Apps
वायला "किरण्या लका आवल की लौकर" लालजर्द लिपस्टीक ओठावर फिरवायच्या आधी तोंडातली तंबाखू थुंकायला किरण्या उठला. ऊंच टाचेचा तोल सांभाळत चुडीदार सावरुन अन ओढणी ओढून परत गायछाप मळायला लागला. "किरण्या, तुझी सुपारी नाय फोडायला चाललो भाड्या. येतोयास का न्हाय?" "आहाहा आली माझी डार्लिंग. आयायाया काय दिसतीया" म्हणत दिप्याने किरण्याला आवळला. "गपेय तुझ्यायला. आजची हजाराची लेवल कर अन पाश्शे त्या राणीवर घालीव. हितं काय उपेग नाही. मला नड हाय पाचशाची तेवढे गावले की बास्स" दिप्याने झाडीत लावलेली यामा काढली. ओढणीनं तोंड झाकून किरण्या मागं बसताच गिअरमध्येच उचलली. घाटाखाली हायवेवर किरण्याला सोडून दिप्या सराट घाटाच्या वर धाब्यावर जाऊन बसला. परश्या न आज्या आधीच मोबाईलात तोंडं घालून कोपर्यात बसले होते. तिसरी सिग्रेट पेटवणार इतक्यात दिप्याचा फोन बारीकसा वाजला. पाटदिशी दोन गाड्या धाब्यावरुन हलल्या. घाटातून वर चढणारे दोन ट्रकलाईट पार वरुन दिसत होते. कोपर्यावर लाईट बंद होऊन दोन्ही ईंडिकेटर चमकायला लागले तसा दिप्याने अॅक्सीलेटर पिळला. ट्रक गाठस्तोवर ड...
- Get link
- X
- Other Apps
जयविजय "ओ दादा येऊ का आतमदे" अगदी टिपिकल बार्शी टोनमध्ये आवाज आला. आधी कुठेतरी पाहिल्यासारखा वाटणारा चेहरा, साधे कपडे आणि हातात एक पिशवी. "जरा काम होतं फ्लेक्सचं. जास्त नाय ३० फुटाच हाय पन आरजंट पायजे" मला अजूनही आठवत नाहीये याला कुठं पाह्यलय मी. "जय्विजय पायजेत छापून ७ फूटाचे दोन" "दुपारी जेवायला गेलेले डीटीपी ऑपरेटर अजून आले नाहीत. बसा जरा." ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- जयविजय डोळ्यासमोर उभे राहिले बार्शीतले वाडे, मोठमोठे दरवाजे, दारावर लग्नप्रसंगी रंगवले जाणारे भालदार चोपदार म्हणजेच बार्शीच्या भाषेत जयविजय. चार पाच रंगाने भरलेल्या वाट्या आन तीनच ब्रश घेऊन तासाभरात घ्रराचे लग्नघर करणारा पेंटर. तो तास आणायसाठी मात्र पत्रिका छापायला देतानाच त्याला आमंत्रण द्यावे लागे. लग्न अगदी तोंडावर आले की आम्ही बच्चे कंपनी त्याच्या मागावर सुटायची. दुकानी, त्याच्या घरी आणि तो काम करत असलेल्या घरी अशा सगळीकडे चकरा झाल्यावर हा कलाकार सापडाय...