अंतर

काय खरं नाही बघा आयटीचे साहेब. तुमचा निखिल आयटीलाच ना पुण्यात?
हो रे, चांगले पगार असतात पण त्यांना.
अमेरिकेत काय लैच मंदी आलीय म्हणं. मग ह्यांचं अवघडच की सगळं.
___________________________________________________________________
लहानशा गावातली सिंगल ब्रँच कोऑपरेटिव्ह बँक अन धडपडून मिळालेली मॅनेजरची खुर्ची.
सोमवारची गर्दी अन कॅश कौंटरला टोकन घेऊन गावगन्ना पत्रकार कम संपादकाने घातलेला उगा वाद.
बँकेत खड़खडाट अशी प्रश्नचिन्ह टाकलेली बातमी अन ब्लॅकने खपलेला त्याचा पेपर.
खातेदारांची पैसे काढायला गर्दी अन संचालकांनी मारलेली कलटी.
मर्जिंगआधीच्या कोर्टातल्या सुनावण्या अन बिनपगारी ढकललेली वर्षे.
एकेक रुपया जोडत शिकवलेला मुलगा अन एका चिल्लर पतसंस्थेत गहाण टाकलेली जिंदगी.
___________________________________________________________________
हॅलो निखिल, बेटा ठिक चाललंय ना सगळं तिकडे?

Comments

Popular posts from this blog

पॉईंट झीरो

सैराट आन सैराटच

मालकीण