त्रैराशिक



ह्यालो
बोल ग हिरॉईन
आयक की रव्या. मला कनाय राव्हल्या भेटला होता.
तूच बोंबलत गेली आसचील. आता म्या नाहीना गावात. काय भरोसा नाय तुझा.
हा. तू लै शिटीत सवळाच राह्यलास जनू. मी हाय म्हनून नायतर छप्पन्न फिरतेत माझ्यमागं.
हा म्हैते लै फेरनलवलीची औलाद.
ते जौ दे. पह्यले मला सांग किती मरतोस माझ्यावर?
म्या व्हय? समज बत्तीस जीबी तर आसंन. राव्हल्या काय केला ते सांग ऊंडगे आदी.
तेचाकडं कनाय तसला आंडराड मोबाईल हाय. फोटो पाटिवता येतेत मन.
मग?
मग काय. म्या नीट्ट सांगितलं. जेचं माज्यावर सच्चं प्रेम तोच घिऊन दील मला आसला फोन.
लै नीच हायस ग टवळे. नेक्स्ट टैम आनतो.
________________________________________________________________________
ह्यालो ह्यालो
बोल की आये. एकतर मिस्कॉल करतीस आन कॉल केल्यावर बोलाया काय हुतय.
आरं रव्या आयक की.
आता म्होरं बोलतीस का ठिवू फोन. मला हापिसाला जायचय.
जाशील रं बाळा पण आयक की. ह्ये तुझा बाप काय सुदरंना बग.
आता काय केलं? आन ह्यो नंबर कुनाचाय?
तेच रं. काल पिऊन कुठं उलथला की दारुपायी इकून आला मोबाईल देव जाणं.
मग?
तसं नव्हं र बाळा. आता म्होरल्या टायमाला येतुयास न तवा एखांदा आण की डबडा. सादा का आसना पण आण.
आये हितं शेहरात लै खर्च आसतेत ग. पुरत नाह्यती माझं मला आन तुम्चं आसलं कायतर. बगू बगू करतो कायतर.
________________________________________________________________________
ह्यलो रव्या
बोलो ना सेठ
रव्या भाडखाव कामाचं बग आधी. कुठं खपलास तीन दिवस?
नाय ना सेठ. हितच हाय ना मंडईत.
फुकन्या तितं काय बी मिलनार नाय. स्टेसनवर जा सीधा.
पण सेठ दोन पीस तर काढलेत की हितं.
अब्बे मी काय बोलतो सुन. तस्ले पीस कोन बी घेत नैत आता. कस्टमरको अँड्रोईड मंगता.
पण सेठ पोलीसमामूचं बी भ्या वाटतं.
तो पैले माझे उचल परत कर. तेरेसे ज्यादा रिस्क मै ऊठाता इदर.
नाय नाय सेठ. जातो स्टेशनवर.
हा. और सुन. कमसेकम चार पीस होना मेरेको नये बडेवाले. नई तो सीधा रास्ता मालूम है तेरेको.
हा सेठ. आनतो अँड्रोईडच. करतो कायतर आता.
________________________________________________________________________

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पॉईंट झीरो

सैराट आन सैराटच

मालकीण