दिव्यचक्षु

अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीच्या ऐसी केबिनात
सगळ्यात सामसूम पीसीवरच्या स्क्रीनसमोर
सगळ्यात शेवटच्या अ‍ॅड डिझाईनच्या
सगळ्यात शेवटच्या टॅगलाईनवर
मी काम करतो.
रास्टर फोटोशॉप अन् व्हेक्टर कोरलवर
अनिर्बंध सत्ता चालते ज्याची आणि
कम्प्युटर ग्राफिक्सध्ये ज्याचे चालतात हात
डिझाईनर पॅडवर हवे तसा माऊस वळवत
तो मी एज्युकेटेड क्रियेटिव्ह डिझाईनर.
एजन्सीचे मालक सतत नजर ठेवतात
पाठलाग करतात चुकलेली प्रुफे घेऊन
चुका काढतात स्वतःलाच न कळणार्‍या
स्क्वेअरसेमीच्या व्यवहाराचा एकटाच हा शत्रू.
डिझाईनर होतोय क्रियेटिव्हली नि:संतान.
गडगंज क्लायंट आणतो आधीच फसलेली येडझवी स्कीम एखादी
मोठ्या कॅम्पेनिंगची काल्पनिक कारंजी उसळतात
जाहीरातींचे लेआऊटवर लेआऊट प्रिंटतात
नव्या कन्सेप्टची कुदळ मारली जाते पुन:पुन्हा
रडतो डिझाईनर टेबलावर डोके ठेवून
एका मास्टरस्ट्रोक कन्सेप्टच्या जन्माची प्रार्थना करतो.
आर्टिस्ट. व्हिज्युअलायझर, मेंटॉर.

Comments

Popular posts from this blog

सैराट आन सैराटच

मालकीण

पॉईंट झीरो